Shaikh Hasina यांच्या राजीनाम्याचा भारतावर परिणाम होणार का? माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित काय म्हणतात?

252

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या जनक्षोभामुळे अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. सोमवारी शेख हसीना सैन्यदलाच्या विमानाने भारताच्या दिशेने रवाना झाल्या. याविषयी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला प्रतिक्रिया देताना म्हटले की, शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी राजीनामा देणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

(हेही वाचा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर Bangladesh च्या PM Sheikh Hasina यांनी सोडला ढाका; हजारो आंदोलक पंतप्रधान निवासात घुसले)

काय म्हणाले प्रवीण दीक्षित?

शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी राजीनामा देण्याची घटना ही गंभीर आहे. दक्षिण आशियामध्ये खळबळ उडवणारी ही घटना आहे. तसेच भारताला काळजी वाटणारी ही घटना आहे. या घटनेचे काय परिणाम होतात, हे पहावे लागणार आहे. केवळ सीमावर्ती भागातच नव्हे तर बांगलादेशच्या इतरत्र भागातही त्याचे काय परिणाम होतात, हे बघावे लागेल. आता त्या देशात कोणत्या स्वरूपाचे सरकार स्थापन होईल, ते भारताच्या बाजूचे असणार का, हेदेखील बघावे लागणार आहे. बांगलादेशात जो काही हिंसाचार सुरु आहे, त्यात भारत हस्तक्षेप करणार नाही. परंतु त्या ठिकाणी लवकर शांतता प्रथापित होणे आवश्यक आहे. शेख हसीना भारतात तात्पुरत्या आश्रयासाठी येत आहेत. कारण त्यांना भारत हे सुरक्षित स्थान वाटते. तसेच भारतही त्यांची योग्य ती काळजी घेईल, त्यांना सुरक्षा पुरवेल, असे प्रवीण दीक्षित म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.