पंतप्रधान संग्रहालयातून नेलेली नेहरूंची कागदपत्रे Sonia Gandhi आता जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडला देणार?

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी २००८ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) खाजगी संग्रहातील (गांधी कुटुंबाने दान केलेल्या) कागदपत्रांच्या पेट्या PM Museum या राष्ट्रीय संग्रहालयातून काढून घेतल्या होत्या. आता सरकार ही कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे.

399
केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान संग्रहालयाचा प्रतिकार करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड (जेएनएमएफ) नेहरूंच्या १३५व्या जन्मवर्षानिमित्त त्यांचे सर्वसमावेशक अभिलेखागार सुरू करणार आहे. हे डिजिटल अभिलेखागार nehruarchive.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये नेहरूंची सर्व भाषणे, संवाद, पत्रव्यवहार यांचा समावेश असेल. या अभिलेखागाराचे उद्घाटन करताना जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडचे ट्रस्टी आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, ही अभिलेखागार भारतातील आणि परदेशातील सर्व संसाधनांमधून नेहरूंशी संबंधित सर्व माहिती गोळा करून ती मल्टीमीडिया स्वरूपात उपलब्ध करून देईल. यामध्ये सॊनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयातून नेहरूंची पळवलेली कागदपत्रे असण्याची शक्यता आहे, कारण सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राजवटीत या संग्रहालयातून नेहरूंच्या कागदपत्रांनी भरलेल्या ५१ पेट्या नेल्या त्या परत केल्या नाहीत.

संग्रहालयात १००० हून अधिक नेते आणि मान्यवरांचे दस्तावेज संग्रहित

पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल, PMML) पूर्वी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल, NMML) हे देशातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. या संग्रहालयात १००० हून अधिक महत्त्वपूर्ण नेते आणि मान्यवर यांचे दस्तावेज संग्रहित करण्यात आले आहेत. या संग्रहालयात असलेल्या पंतप्रधान नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) कागदपत्रांपैकी ५१ पेट्या भरून कागदपत्रे सोनिया गांधी यांनी काढून घेतली आहेत. ही कागदपत्रे १९७१ मध्ये इंदिरा गांधी (Sonia Gandhi) आणि नंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीच संग्रहालयाला दान केली होती. मात्र  काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी २००८ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) खाजगी संग्रहातील (गांधी कुटुंबाने दान केलेल्या) कागदपत्रांच्या पेट्या PM Museum या राष्ट्रीय संग्रहालयातून काढून घेतल्या होत्या. आता सरकार ही कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे. त्यानंतर पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाने (पीएमएमएल) यांनी निर्णय घेतला आहे की, यापुढे कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींची खाजगी कागदपत्रे पीएम म्युझियममध्ये जमा करायची असतील, तर ती कागदपत्रे अनिश्चित काळासाठी गोपनीय ठेवण्याची अट स्वीकारण्यात येणार नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.