आता महाराष्ट्रातलं सरकार बदललेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारला बहुमत प्राप्त झालेलं आहे. अडीच वर्षे रखडलेला आणि अहंकारापायी नुकसानीत गेलेला मेट्रो प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे. आरे येथेच कारशेड बनणार असल्याचे आता या नवीन सरकारने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : व्हिप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर होणार कारवाई, आदित्य ठाकरेंचे नाव मात्र वगळले )
आंदोलनजीवी पुन्हा एकदा सक्रिय होणार
लगेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. ठाकरेंची भूमिका अतिशय संशयास्पद वाटते आहे. त्यांना तो प्रकल्प तिथे का होऊ द्यायचा नाही हे एक मोठं कोडंच आहे. त्याचबरोबर पर्यावरणप्रेमी संस्थांनी याविरोधात आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आंदोलनजीवी पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कोर्टाने आरेवर निर्णय दिलेला आहे. झाडे तोडून झालेली आहेत आणि आता कोणत्याही प्रकारचं नुकसान पर्यावरणाला पोहोचणार नाही हे स्पष्ट असताना आता आंदोलन का? आणि नेमकं असं आरेमध्ये दडलं तरी काय आहे? मेट्रो झाल्यामुळे कोणत्या बिल्डरचं नुकसान होणार आहे, यावर शोध पत्रकारिता झाली पाहिजे.
आंदोलन नेमकं कोणासाठी आहे?
आरेसाठी आंदोलन करणारे आंदोलनजीवी हे टिश्यू पेपर, कार, एसी आणि मिनरल वॉटर पिणारे आहेत. ज्यामुळे सर्वात जास्त पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याउलट ज्यांना मेट्रो हवी आहे, ती सामान्य जनता रोज बस आणि लोकलचे धक्के खाऊन प्रवास करते. त्यांना रिक्षाचं भाडं देखील परवडत नाही. मग हे आंदोलन नेमकं कोणासाठी आहे?
कोणाचा फायदा या आंदोलनातून होणार आहे? कोणता बिल्डर खुश होणार आहे किंवा कोणतं टुलकीट आता तयार होणार आहे? या आंदोलनाच्या माध्यमातून आणखी किती आंदोलने महाराष्ट्रात होणार आहे? हे आपल्याला येत्या काळात समजेल. पण सरकार बदललं आणि आंदोलनजीवी पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. तरी सामान्य जनता देखील आता जागी झाली आहे.
Join Our WhatsApp Community