लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जानेवारीचा सातवा हप्ता महिलांच्या खातात जमा होऊ लागले आहेत. पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना याचा लाभ मिळाला, दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना त्यांचा लाभ मिळाला. मात्र या योजनेमध्ये आता चाळणी लागणार आहे, त्यामध्ये किमान ३० लाख महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी खुलासा केला आहे.
(हेही वाचा Uddhav Thackeray द्विधा मनःस्थितीत स्वतंत्र लढल्यास मतविभागणी; आघाडी केल्यास जागांच्या विभागणीचा फटका)
या योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिलांचे अर्ज बाद ठरवले जाणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे. कोणाचेही अर्ज बाद करणार नाही. मला माहीत नाही, ३० लाख हा आकडा कुठून आला. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचे वितरण नेहमीप्रमाणेच सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये ९ तारखेला २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ दिला होता. आता लाभ वितरण २ कोटी ४१ लाख महिलांना झालेला आहे. कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community