
-
प्रतिनिधी
राज्यातील दुग्धशाळा वसाहतींच्या इमारतींचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करण्यासाठी शासन एकात्मिक योजना तयार करणार का? असा महत्त्वाचा सवाल विधान परिषदेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला.
दुग्ध विकास विभागाच्या तारांकित प्रश्नावर चर्चा
बुधवारी विधान परिषदेत दुग्ध विकास विभागाच्या तारांकित प्रश्नावर चर्चा सुरू असताना, आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दुग्धशाळा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून ठोस योजना तयार करण्याची मागणी केली.
(हेही वाचा – MLA Residence : मंत्र्यांकडून आमदार निवासातील खोल्या अद्याप रिकाम्या नाहीच)
दरेकर यांची भूमिका – एकात्मिक विकास योजनेची गरज
सभागृहात बोलताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “राज्यातील दुग्धशाळा वसाहतींच्या इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांचे पुनर्विकासाचे नियोजन झाले, तर त्यातून रहिवाशांसाठी उत्तम घरे उपलब्ध होतील आणि त्या घरांचा उपयोग शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही करता येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “राज्य सरकार सध्या गृहनिर्माण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे आणि अनेक नवीन योजनांची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळेच अशा दुग्धशाळा वसाहतींचा समावेश करून त्यांचा एकात्मिक विकास करण्याची योजना तयार करण्याबाबत सरकार काय विचार करत आहे?”
(हेही वाचा – कोर्टाच्या तारखा लवकर मिळतात, पण एमआरआय-सिटी स्कॅनसाठी प्रतीक्षा ; Rahul Narwekar यांची नाराजी)
दुग्ध विकास मंत्र्यांचे उत्तर – सकारात्मक भूमिका
दरेकर (Pravin Darekar) यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दुग्ध विकास मंत्री अतुल सावे म्हणाले, “दरेकर यांनी मांडलेली सूचना सरकार गांभीर्याने विचारात घेईल. राज्यातील ज्या डेअरीच्या जागा आहेत, त्याठिकाणी गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून काही करता येऊ शकते का, याचा शासन नक्की विचार करेल आणि पुढील काळात योग्य तो प्रयत्न केला जाईल.”
वसाहतींच्या विकासासाठी लवकरच निर्णयाची अपेक्षा
या चर्चेमुळे दुग्धशाळा वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात राज्य सरकारकडून लवकरच ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दुग्ध व्यवसायाशी संबंधित नागरिक आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community