शिंदेंच्या राजकीय उदयामुळे राज ठाकरेंना धोका निर्माण होणार का?

190

दोन दिवसांपासून सध्या राजकीय पटलावर एकच नाव चर्चेत आहे, एकनाथ शिंदे… नुकताच धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटात एकनाथ शिंदे हेच आनंद दिघेंचे खरे वारसदार व चळवळीतील नेते असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा चर्चेत आले. हिंदुत्वासाठी आनंद दिघे झटले आणि एकनाथ शिंदे तोच वारसा पुढे चालवत असल्याचे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

( हेही वाचा : अडीच वर्षांनी ठाकरे यांनी सांगितले मी मुख्यमंत्री कसा बनलो!)

हिंदुत्ववादी राज ठाकरेंकडे न जाता एकनाथ शिंदेंसोबत जोडले जाऊ शकतात

आता मशिदींवरील भोंग्यांद्वारे राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर भाजपचे सॉफ्ट हिंदुत्व नको असलेला पुन्हा एकदा राज ठाकरेंकडे आकृष्ट झाले होते. शिवसेने हिंदुत्व सोडल्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे फॉर्मात येतील अशी चर्चा सुरु होती आणि कोणत्याही विचारधारेत मवाळ आणि जहाल लोक असतात. तर हिंदुत्वामधल्या जहाल लोकांना राज ठाकरे आधार वाटू शकतात. असं असतानाच एकनाथ शिंदे चर्चेत आले.

आता कट्टर हिंदुत्ववादी वोट बॅंक एकनाथरावांकडे वळू शकते. एकतर ते आनंद दिघेंचे शिष्य आहेत. कट्टर हिंदू दिघेंना गुरुवर्य म्हणतात, धर्मवीर म्हणतात. आणि एकनाथ शिंदे हे त्यांचे पट्टशिष्य असल्यामुळे हे हिंदुत्ववादी राज ठाकरेंकडे न जाता एकनाथ शिंदेंसोबत जोडले जाऊ शकतात.

( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)

अर्थात त्यासाठी शिंदे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली पाहिजे. ही राजकीय खेळी यशस्वी झाली तर महाराष्ट्रावरचं एकदंर ठाकरे नावाचं वलय अगदीच कमी होऊ शकतं आणि शिंदेशाही निर्माण होऊ शकते. राजकारणाच्या आखाड्यात राज ठाकरेंना वेळोवेळी संधी होती, पण त्यांनी ती स्वतःहून घालवलेली आहे. त्यामुळे शिंदेंच्या राजकीय उदयामुळे राज ठाकरेंना नक्कीच धोका निर्माण होणार आहे. आता राज हिंदुत्वाकडे वळलेले आहेत, ते पुन्हा माघारी फिरु शकत नाहीत. आता काहीच दिवसातंच समजेल, ठाकरे की शिंदे?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.