लोकसभेला महाविकास आघाडीत सांगलीत (Sangli) बंडखोरी करत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या विशाल पाटलांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे संकेत दिले. महाविकास आघाडीत तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यातच शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ विशाल पाटलांनी तासगाव-कवठे महांकाळला अजित घोरपडेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत पुन्हा बंडखोरीचे संकेत दिले आहे. त्यामुळे आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटलांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
विशाल पाटलांनी लोकसभेला बंडखोरी करत ठाकरे गटाच्या पैलवानाला आस्मान दाखवलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा कवठे महांकाळकडे वळवला आहे. खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडेंना पाठिंबा देण्याचा निर्धार केल्यामुळे मविआत पुन्हा चलबिचल सुरू झाली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटलांनी तासगाव-कवठे महांकाळ विधानसभेसाठी मुलगा प्रभाकर पाटलांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर शरद पवारांनी रोहित पाटलांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे माजी मंत्री अजित घोरपडेंनी शेतकरी आघाडी स्थापन करत तासगाव-कवठे महांकाळमधून लढण्याचं जाहीर केलं आहे. (Sangli)
(हेही वाचा Bangladesh बांगलादेशात कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली हिंदू विद्यार्थ्याची विद्यापिठातून हकालपट्टी)
नक्की कोण आहेत अजित घोरपडे?
अजित घोरपडे हे आर आर पाटलांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. १९८५ मध्ये काँग्रेसला आव्हान देत जनता पक्षातून निवडणूक लढवली होती. घोरपडेंनी १९९५ मध्ये अपक्ष निवडणूक जिंकली. युतीच्या सरकारमध्ये घोरपडेंना त्यावेळी युती सरकारमध्ये राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. १९९९ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून विजय झाले. आघाडी सरकारमध्ये तब्बल दोन वेळा मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली. २०१४ मध्ये भाजपामधून निवडणूक लढवूनही त्यांचा पराभव झाला होता. (Sangli)
मागील आठवड्यात काँग्रेसचे दिग्गज नेते पतंगराव कदम यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये (Sangli) काँग्रेसच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.त्याआधी विश्वजित, विशाल यांनी दिल्लीत ठाकरेंची भेट घेऊन आठवडा उलटण्याच्या आधीच विशाल यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ‘मशाल’ पेटली आहे.
Join Our WhatsApp Community