राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए (NDA) सरकारचा रविवारी शपथविधी होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी ९ जून रोजी, दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhawan) संध्याकाळी ०७:१५ मिनिटांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींन सोबत जवळपास ७० खासदारांची शपथ घेण्यासची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळालं नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंऐवजी प्रतापराव जाधवांना मंत्रीपद देण्यात येणार आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Shrikant Shinde)
(हेही वाचा – सरपंच ते केंद्रीय मंत्री… असा आहे Raksha Khadse यांचा राजकीय प्रवास)
नेमकं प्रकरण काय ?
केंद्रात शुक्रवारी एनडीए ३.० (Modi 3.0) अर्थात एनडीएच्या सलग तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर आता केंद्रात मंत्रीपदी कुणाकुणाची वर्णी लागणार? याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. शपथविधीसंदर्भात देशभरातील अनेक खासदारांना फोन गेले असताना अजित पवार (Ajit Pawar) गटातील एकाही खासदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. “आम्ही राज्यमंत्रीपद स्वतंत्र पदभार हे पद देऊ करत होतो. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं. त्यामुळे पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी त्यावर विचार करण्यात येईल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. दुसरीकडे शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रीपद मिळालं असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अखेर मंत्रीपदाची माळ प्रतापराव जाधव यांच्या गळ्यात पडली. श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी यावर टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. (Shrikant Shinde)
काय म्हणाले श्रीकांत शिंदे मंत्रीपदाबाबत?
“एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) नेहमीच कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं. आजही तेच उदाहरण महाराष्ट्रानं पाहिलं. मी तिसऱ्यांदा खासदार झालो. सध्याच्या परिस्तितीतही मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो. सगळ्यांची इच्छा होती की मी केंद्रात मंत्री व्हायला हवं. पण आत्ता पक्षाला सगळ्यात जास्त गरज पक्षबांधणीची आहे”, असे विधान श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केले. (Shrikant Shinde )
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community