मंत्रालय…महाराष्ट्राचा कारभार जेथून हाकला जातो, ते ठिकाण! आता ते वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्धीस आले आहे. जे मंत्रालय सुसंस्कृत महाराष्ट्राचे मानचिन्ह समजले जाते, त्याच मंत्रालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने मंत्रालयातील ‘ते’ मद्यपी कोण? कुणी केली गटारी? कुणी रिचवल्या बाटल्या?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, त्याच मंत्रालयाच्या आवारात आता दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. त्यामुळे हे मंत्रालय की मद्यालय?, असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या.
मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे, हे दिसून येत आहे.
– प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
(हेही वाचा : 15 ऑगस्टपासून कसा मिळणार लोकल ट्रेनचा पास? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर काय अगरबत्तीचा स्टॉक मिळणार?? मंत्रालयात कुठल्या स्तराचं काम चालू आहे यावरून लक्षात येते. सरकारची भीती मंत्रालयात सुद्धा राहिलेली नाही, आता हे सरकार फक्त चौकशीचे आदेश देणार आणि माहिती काढणार कोण कुठल्या ब्रँडची पितो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 10, 2021
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा-
दारूच्या बाटल्या मंत्रालयात गेल्याच कशा?
मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक ये-जा करत असतात. मंत्रालयात पासशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यातच कोरोनामुळे देखील सर्वांना प्रवेश दिला जात नाही. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. मात्र तरीदेखील मंत्रालयात बाटल्या गेल्याच कशा? आणि त्या नेमक्या कुणाच्या?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Communityया प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही अत्यंत गंभीर बातमी आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलिस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही.
– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभाग