राज्याचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर पासून सुरू झाले आहे. विदर्भातील जनता या अधिवेशनाकडे फार अपेक्षेने डोळे लावून बसलेली असते. अशातच विधानभवनात आटापिटा करून पास मिळवून आल्यानंतर देखील मंत्र्यांची मात्र भेटच मिळेना. कारण मंत्रीच दालनात बसत नसल्याचे चित्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनात दिसून येत आहे आणि कारण देखील तसच आहे ज्येष्ठमंत्र्यांना मोठे दालन मात्र काही मंत्र्यांना छोटे दालन मिळाल्याने कॅबिनेट मंत्री असून देखील ते आपल्या दालनात बसत नसल्याचे चित्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनात दिसून येत आहे. (Winter Session 2023)
मोठे दालन मिळालेले मंत्री
- राधाकृष्ण विखे पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- छगन भुजबळ
- हसन मुश्रीफ
- दिलीप वळसे पाटील
- चंद्रकांत दादा पाटील
- विजयकुमार गावित
- गिरीश महाजन
- दादा भुसे
लहान दालन मिळालेले मंत्री
- मंगलप्रभात लोढा
- शंभूराज देसाई
- रवींद्र चव्हाण
- अतुल सावे
- संदीपान भुमरे
- धर्मराव आत्राम
- अदिती तटकरे
- अनिल भाईदास पाटील
(हेही वाचा – Halal : महाराष्ट्रातही हलाल बंदी करा; विधानसभेत मागणी)
अशा कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना छोटी दालने मिळाल्याने हे मंत्री आपल्या दालनात कमी परंतु पक्ष कार्यालयात जास्त दिसून येत आहेत. खाजगीमध्ये बोलताना या मंत्र्यांनी नागपूर विधान मंडळात छोटी दालने मिळाल्याने कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांना बसायला देखील व्यवस्थित जागा नसल्याने ते दालनात कमी बसत असल्याची खंत खाजगीत बोलून दाखवली आहे. (Winter Session 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community