विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन अवघ्या एका आठवड्यावर आले असताना, प्रशासनाकडून अधिवेशनासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. (Winter Session 2024) या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter session) नागपुरात १८ ते २० हजार अधिकारी, कर्मचारी वर्ग पोहोचणार असून, त्यांच्या निवासाची व्यवस्था विविध निवासी इमारती, शासकीय गेस्ट हाऊस, लॉज आणि वसतिगृहांमध्ये करण्यात येत आहे. तसेच यामध्ये हिवाळी अधिवेशनासाठी येणारे मंत्री, राज्यमंत्री, व्हीआयपी, आमदार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहनचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे.
(हेही वाचा – Congress Legislature Group Leader : काँग्रेसला मिळत नाही विधिमंडळ गटनेता ?) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रामगिरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवगिरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विजयगड बंगला तयार करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, विधान परिषद सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी रवी भवनात बंगले तयार झाले आहेत. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे रवी भवनमधील २४ बंगले आणि नागभवनमधील १६ बंगले मंत्री व राज्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच मोर्चात येणाऱ्यांसाठी जाफरनगर येथील सद्भावना लॉनही ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे दोन हजार लोकांसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे.