राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठ्या संख्येने विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळेच मोठ्या धुमधडाक्यात गुरुवार,०५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी घेतली.दरम्यान, यंदा संख्याबळ पुरेसे नसल्यामुळे हिवाळी अधिवेशनात एकही विरोधी पक्षनेता (Opposition Leader) नसणार. (Winter Session 2024)
सत्तास्थापनेनंतर महायुतीच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरवण्यात आली आहे. येत्या १६ डिसेंबरपासून अधिवेशन घेण्यात येणार असून एक आठवड्याचे कामकाज सध्या निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी १० डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्यासाठी हिवाळी अधिवेशन नवे नाही. विरोधात असताना त्यांनी अनेक अधिवेशने गाजवली आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधकांचा सामनाही केला आहे.
(हेही वाचा – आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विरोधी पक्ष नेता होण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ एकाही पक्षाकडे नसल्यामुळे राज्यात पाच वर्षे विरोधी पक्ष नेता हे पदच राहाणार नाही. आणि तीनही पक्ष मिळून सर्वांनी सर्वसंमतीने विरोधी पक्षनेता म्हणून एकाची निवड केली तरी तशी प्रथा नाही, अशी माहिती विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे (Anant Kalse) यांनी दिली. समजा तीनही पक्षांनी मिळून सर्वसंमतीने विरोधी पक्षनेता म्हणून एकाची निवड केली तरी त्याला मान्यता द्यायची की नाही याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यांनी नाकारले तर त्याला आव्हान दिले जावू शकत नाही असे कळसे यांनी स्पष्ट केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community