संसदेत झालेल्या (Winter Session) घुसखोरीच्या मुद्द्यावरून आजही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे योग्य वर्तनाचा ठपका ठेवत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ३१ खासदारांना निलंबित केले आहे. यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury), टीआर बालू (T R Baalu), दयानिधी मारन (Dayanidhi Maran), टीएमसी खासदार सौगर राय (Saugata Roy) यांचाही समावेश आहे.
A few more MPs suspended from Lok Sabha, including Leader of Congress in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury. A total of 31 Lok Sabha MPs suspended today.
— ANI (@ANI) December 18, 2023
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Minister Prahlad Joshi) यांनी या खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. दरम्यान, याआधी विरोधी पक्षाच्या १४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या ४५च्या वर पोहोचली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community