हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन

152

तीन वर्षांनंतर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. १९ ते ३० डिसेंबर या काळात चाललेल्या अधिवेशनात विकासावर कमी आणि आरोप-प्रत्यारोपांवर अधिक चर्चा झाली. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे.

( हेही वाचा : शीख धर्मियांचा अवमान केलात, महाराष्ट्राची जनता नोंद ठेवील – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा  )

अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज ८४ तास १० मिनिटे चालले. हे दैनंदिन प्रमाण सरासरी ८ तास २५ मिनिटे इतके होते. या अधिवेशनात १०६ लक्षवेधींवर चर्चा झाली. अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९१.३२ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५०.५७ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७९.८३ टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

१२ विधेयके मंजूर

हिवाळी अधिवेशनात १२ विधेयके मंजूर करण्यात आली. त्यात (१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२२, (२) महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, २०२२ (३) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा)विधेयक, २०२२ (४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२, (५) जे.एस.पी.एम. युनिव्हसिर्टी विधेयक, २०२२ नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत (६) महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ (७) महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, २०२२ (८) युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, पुणे विधेयक, २०२२ (९) पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, २०२२ (१०) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, २०२२ (११) उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, २०२२ (१२) महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२ आदींचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.