हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी सरकारकडून अमान्य करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज आणि कालावधी वाढवला जावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. या संदर्भात कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या झालेल्या बैठकीत झालेल्या सरकार सकारात्मक नसून झालेल्या निर्णयावरून विरोधकांची मागणी अमान्य करून ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे ३० डिसेंबरपर्यंतच सुरू राहणार आहे.
(हेही वाचा – थर्टीफर्स्टसाठी मुंबईकरच नाही तर पोलीसही सज्ज! मुंबईत 100 ठिकाणी नाकाबंदी, ‘हे’ मार्ग राहणार बंद)
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नियोजित काळातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
ठरलेल्या कालावधीतच संपणार अधिवेशन
अधिवेशनात नेत्यांचे घोटाळे, त्यांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप या विषयांवरच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे पडल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली. हे जनतेचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्यात यावा अशी मागणी होत होती. अशातच हा कालावधी आठवडाभराने वाढवण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांनीही केली होती. मात्र ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे. विरोधकांची मागणी फेटाळल्याने आता हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबर रोजीच म्हणजे ठरलेल्या कालावधीतच संपणार आहे. उद्या, गुरूवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
Join Our WhatsApp Community