अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवारी 26 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. दिशा सालियन प्रकरणावरुन शिंदे गट आणि भाजपने शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना घरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नागपूरात दाखल झाले. आता विधानपरिषदेत बोलताना, उद्धव ठाकरे सीमावादावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौ-यावर आहेत. यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौ-यावरुन सवाल उपस्थित केला आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहेत का? असे उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेमध्ये म्हटले आहे. तसेच, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा निर्णय येईपर्यंत केंद्र शासित भाग झाला पाहिजे, असेदेखील ठाकरे यांनी म्हटले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावर जोरात बोलतात, परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत ब्र ही काढलेला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
( हेही वाचा: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरण; आदेश बांदेकरांवर मनसेने केला ‘हा’ नवा आरोप )