Congress : नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्याकडून कॉंग्रेसची उपेक्षा

जेडीयू आणि राजद १७-१७ जागा लढणार; कॉंग्रेस आणि डाव्यांसाठी फक्त सहा जागा

164
Congress : नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्याकडून कॉंग्रेसची उपेक्षा
Congress : नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्याकडून कॉंग्रेसची उपेक्षा
  • वंदना बर्वे

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यानंतर नितीशकुमार (Nitish Kumar) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या जोडीने कॉंग्रेसला (Congress) खरी जागा दाखविली आहे. इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू व्हायची असतानाच जेडीयू (JDU) आणि राजद (RJD) या दोन्ही पक्षांनी आपसात जागा वाटून घेतल्या आहेत. यामुळे बिहारमध्ये कॉंग्रेसला (Congress) फक्त सहा किंवा त्याहीपेक्षा कमी जागांवर लढावे लागणार आहे. (Congress)

सविस्तर वृत्त असे की, इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) दिल्लीतील चौथ्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू सुध्दा झालेली नाही. मात्र, जेडीयू (JDU) आणि राजदने (RJD) आपसात १७-१७ जागा वाटून घेतल्या आहेत. कॉंग्रेससा ठी (Congress)हा जबरदस्त धक्का मानला जात आहे. (Congress)

(हेही वाचा – Pandharpur Mandir : पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी)

कॉंग्रेसने १० जागा तर भाकपा मालेने केली पाच जागांवर मागणी

बिहारमध्ये (Bihar) लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील ३४ जागा जेडीयू (JDU) आणि राजदने (RJD) आपसात वाटून घेतल्या आहेत. अर्थात दोन्ही पक्ष १७-१७ जागा लढविणार आहेत. दोन्ही पक्षांनी ३४ जागा लढविल्या तर कॉंग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षासाठी फक्त सहा जागा उरतात. भाकपा मालेने एकापेक्षा जास्त जागांची मागणी केली तर कॉंग्रेसच्या (Congress) वाट्याला तेवढ्याच कमी जागा येतील, हे येथे उल्लेखनीय. (Congress)

२०१९ च्या निवडणुकीतही मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षाने १७ जागा लढविल्या होत्या. तेव्हा जेडीयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती होती. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी नितीशकुमार (Nitish Kumar) यांची मागणी मान्य केली आहे. कॉंग्रेस (Congress) आणि डावे पक्ष यापैकी कोण किती जागा लढविणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, कॉंग्रेसने (Congress) १० जागा आणि भाकपा मालेने पाच जागांची मागणी केली आहे. याबाबत कॉंग्रेसने (Congress) लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना लेखी कळविले आहे. मात्र, जेडीयू (JDU) आणि राजद (RJD) यांनी तटस्थ भूमिका घेतली तर कॉंग्रेसला (Congress) मोठा त्याग करावा लागू शकतो. भाकपा माले एका जागेवर मान्य झाला नाही तर कॉंग्रेसला (Congress) आणखी एक जागा सोडावी लागू शकते. (Congress)

(हेही वाचा – Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश)

…यामुळे कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का

कॉंग्रेस (Congress) हायकमांडची अलिकडेच बिहारमधील नेत्यांसोबत चर्चा झाली होती. यापूर्वी, जेडीयू आणि राजदमध्ये जागा वाटपावरून एकमत झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत राजद आणि कॉंग्रेस (Congress) आघाडी करून लढले होते. तेव्हा कॉंग्रेसने (Congress) नऊ जागा लढविल्या होत्या आणि एक जागा निवडून आली होती. उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला पाच, जतीनराम मांझी आणि मुकेश साहनी यांच्या पक्षाला प्रत्येकी तीन-तीन जागा देण्यात आल्या होत्या. भाकपा मालेला राजदने आपल्या कोट्यातील एक जागा दिली होती. (Congress)

अशात, कॉंग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमध्ये (Bihar) नक्की किती जागा लढविणार? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण, उत्तरप्रदेशात अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सुध्दा कॉंग्रेससाठी (Congress) फारशा जागा सोडल्या जाणार नसल्याचे सांगितले आहे. यूपीत ८० जागा आहेत. यातील फक्त पाच-सहा जागा कॉंग्रेससाठी (Congress) सोडल्या जाणार असल्याचे ऐकिवात आहे. अशात, कॉंग्रेसला बिहारमध्ये सुध्दा अत्यल्प जागांवर लढावे लागले तर कॉंग्रेसच्या (Congress) प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकतो. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.