‘सेतू’च्या मदतीने भारतातील स्टार्टअप आघाडीच्या उद्योगांशी जोडले जाणार – मंत्री पीयूष गोयल

125

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियातील उद्योजकांना पाठबळ पुरविणाऱ्या ‘सेतू’ या अमेरिकी स्टार्टअपची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या मदतीने भारतातील स्टार्टअप उद्योग निधीचा पुरवठा, विपणन तसेच व्यावसायिकीकरण यासारख्या विविध क्षेत्रात मार्गदर्शन तसेच मदत करण्याच्या उद्देशाने अमेरिका स्थित गुंतवणूकदार आणि स्टार्टअप परिसंस्थेतील आघाडीच्या उद्योगांशी जोडले जाणार आहेत.

भारतातील स्टार्टअप परिसंस्थेशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर केंद्रित असलेल्या भोजनकालीन चर्चेदरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बे एरियात असलेल्या या विषयातील यशस्वी सदस्यांकडून प्राथमिक पातळीवरील भारतीय स्टार्टअप उद्योगांना देशांतर्गत समावेशन आणि मार्गदर्शन यासाठी प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध मार्गांवर या बैठकीत अधिक भर देण्यात आला.

(हेही वाचा – शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परवानगी कोणालाच मिळणार नाही, ‘या’ भाजप मंत्र्यांचा दावा)

भारतातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले अमेरिकेतील तज्ञ मार्गदर्शक आणि भारतात नव्याने उदयाला येत असलेले स्टार्टअप यांच्यामध्ये असलेले भौगोलिक अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने ‘सेतू’ची रचना करण्यात आली आहे. भारतातील स्टार्टअप उद्योगांसाठी एक-केन्द्री समस्या समाधान केंद्र असलेल्या ‘मार्ग’ अर्थात मार्गदर्शन, सल्ला, मदत, लवचिकता आणि विकास यांच्याशी संबंधित स्टार्टअप भारत उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मार्गदर्शक पोर्टलच्या माध्यमातून या परस्पर संवादाला पाठबळ पुरविले जाईल.

सुविधा मिळण्यातील सुलभतेत सुधारणा करणे, योग्य जुळवणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे, आभासी पद्धतीने बैठकांचे आयोजन करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करणे, विशेष अभ्यासवर्गांचे आयोजन करणे, संबंधित माहिती, विश्लेषण, वैशिष्ट्ये यांच्यासाठी विविक्षित डॅशबोर्ड पुरविणे, स्टार्टअप परिसंस्था सक्षम करणाऱ्या घटकांना या कार्यक्रमाचा भाग करून घेण्यासाठी आणि प्रेरित कार्ये करणे शक्य व्हावे यासाठी समूहाधारित कार्यक्रम आयोजित करणे ही ‘मार्ग’ पोर्टलची मुख्य कार्ये आहेत.

आज भारत स्टार्टअप उद्योगांच्या संदर्भात जगात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत सरकारने या क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर तज्ञ आणि उद्योग जगतातील आघाडीच्या घटकांना भारताच्या स्टार्टअप प्रवासाला अधिक मूल्ये प्रदान करून देशाप्रती योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ‘मार्ग’तर्फे जगभरातील मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत, संपूर्ण जगातील 200 हून अधिक मार्गदर्शक या उपक्रमासाठी ‘मार्ग’च्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक प्रख्यात व्यक्ती आणि स्टार्टअप परिसंस्थांकडून अर्ज सादर करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.