मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जागतिक परिषदेत तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य, कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात क्रांतिकारक बदल होण्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करणे आणि मानवी जीवन अधिक सुसह्य करणे शक्य होईल. राज्य शासनही नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ मध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.” (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला ‘लिमिटेड’ पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; विदर्भातील नाराजी उफाळली)
मुंबईतील जिओ कनेक्शन सेंटरमध्ये पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी च्या वतीने आयोजित या जागतिक परिषदेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी दुबई इकॉनोमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पॅन आयआयटीचे चेअरमन देवासी भट्टाचार्य आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांनी मुंबईला फिनटेक आणि डेटा सेंटरच्या क्षेत्रात जागतिक राजधानी बनवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल बोलताना सांगितले की, “मुंबईमध्ये तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होईल. भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत असून, महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा ध्येय ठरवून त्यासाठी काम करत आहे.” (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Mahakumbh 2025 : महाकुंभात स्फोटाची धमकी; 18 संशयित ताब्यात, संरक्षण मंत्री लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार)
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य शासन कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे, आणि २०२६ पर्यंत १६ गिगावॅट सौर ऊर्जा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. “महाराष्ट्र हा देशातील पहिला राज्य आहे जे कृषीसाठी सौर ऊर्जा कंपन्या स्थापन करणार आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांनी आणखी सांगितले की, राज्य शासन तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपये विमा कवच मिळवून देत आहे. तसेच, “जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील २४ हजार गावांमध्ये जलसंपन्नता निर्माण केली आहे,” असेही त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Sharad Pawar यांच्या गटातील ‘हा’ आमदार साथ सोडून अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार, शिर्डीमध्ये प्रवेश सोहळा निश्चित)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयआयटी मुंबईच्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकास कार्याची प्रशंसा केली. “आयआयटी मुंबई आता एक शैक्षणिक संस्था न राहता ‘इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणून विकसित झाली आहे. द्रोण प्रकल्पावर काम सुरू असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात मोठे बदल घडवले जात आहेत,” असे ते म्हणाले. (CM Devendra Fadnavis)
समारंभात आयआयटीचे संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community