पंतप्रधान मोदी न अडखळता भाषण करतातच कसे? कधी विचार केला आहे?

105

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याव्यतिरिक्त, त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळा ठरवणारा आणखी एक गुण म्हणजे त्यांचे वक्तृत्व कौशल्य. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, त्यांच्या भाषणांमुळे त्यांना ब-याचदा दाद मिळाली आहे. तसेच, त्यांच्या भाषणांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याने व्यत्यय आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तासनतास न अडखळता भाषण कसे काय देतात, याचा विचार केला आहे का? जाणून घेऊया त्यामागील कारण…

‘हे’ आहे कारण

आपल्या भाषणाने, पंतप्रधान मोदी अनेकदा श्रोत्यांना आश्चर्यचकीत करून सोडतात. कोणताच कागद समोर नसताना,  भाषणाचा मजकूर देखील न पाहता इतक्या अस्खलितपणे भाषण कसे देऊ शकतात. ही दमदार भाषणं टेली प्रॉम्प्टर या  उपकरणाच्या मदतीने केली जातात. हे उपकरण अनेक जागतिक नेतेसुद्धा वापरतात. अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याची चाचणी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे उपकरण अत्यंत चांगल्या प्रकारे वापरायचे.

 ( हेही वाचा: विरारमध्येही ओमायक्रॉनचा प्रवेश )

कसे काम करते?

टेली प्रॉम्प्टर्सचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्व काही स्पष्टपणे दिसते. या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, त्यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो.

किती असते किंमत?

टेली प्रॉम्प्टरची किंमत लाखो रुपयांत आहे. कारण ते हाय-टेक तंत्रज्ञानावर काम करतात. ते मिटिंग्स सभा आणि रॅलींमध्ये वापरले जाते. देश-परदेशात यांना मोठी मागणी आहे. टेली प्रॉम्प्टर कमी बजेटमध्येही मिळते. पण ते तेवढे हायटेक नसतात. तसेच, वापरण्यातही अडथळा येतो. पत्रकारितेच्या संस्थांमध्येही अँकर्स याचा वापर करून बातम्या वाचतात आणि तुम्हाला कळतही नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.