Rana दाम्पत्य अमरावतीचे गणित कसे सोडवणार?

Anandrao Adsul यांना समजावण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होतील, पण Bachchu Kadu यांना समजावणे कठीण. 

172
Rana दाम्पत्य अमरावतीचे गणित कसे सोडवणार?

अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपाकडून लोकसभेचे तिकीट जाहीर होताच पक्षात प्रवेश केला. मात्र आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधामुळे विजयाचे अवघड गणित राणा या कसे सोडवणार? (Rana)

अपमान जिव्हारी लागला आणि प्रकरण चिघळले

अमरावतीच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी प्रहार जनाशक्तीचे बच्चू कडू आणि शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी प्रखर विरोध केला होता. मात्र राणा दाम्पत्याने नाराज झालेल्या कडू आणि अडसूळ यांची समजूत काढण्याऐवजी एका प्रचारफेरी दरम्यान ‘ज्यांनी विरोध केला त्यांना याच स्टेजवर येऊन नवनीत राणा यांचा प्रचार करावाच लागेल’ अशा शब्दात नवनीत यांचे पती रवी राणा यांनी अपमान केला. कडू यांना हा अपमान जिव्हारी लागला आणि प्रकरण चिघळले. (Rana)

(हेही वाचा – Fraud : ब्रॅण्डेडच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, कुर्ल्यातला बूट बाजार गुन्हे शाखेच्या रडारवर)

राणांना निवडणुकीत पाडणार

कडू यांनी अपमान सहन न झाल्याने अमरावती मतदार संघातून राणा यांना उमेदवारी दिल्यास प्रहार जनशक्तीकडून उमेदवार उभा केला जाईल, असे जाहीर केले. राणा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही कडू यांनी आपला हट्ट सोडला नसून राणा यांना निवडणुकीत पाडणार, अशी उघड धमकी भाजपाला दिली. (Rana)

विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता

दरम्यान आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत यांनीही अपक्ष म्हणून राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांना समजावण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी होतील, अशी शक्यता आहे. पण कडू यांना समजावणे कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत. कडू यांच्या उमेदवारीने राणा यांच्या विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता असून ते कसे सोडवणार, यावर नवनीत राणा यांचे भवितव्य अवलंबून आहे. (Rana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.