धक्कादायक! सोलापुरात दहा दिवसांत ६१३ मुले कोरोनाबाधित!

जिल्ह्य़ात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

98

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे.

लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढले!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण प्रकर्षाने दिसू लागले आहे. जिल्ह्य़ात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र यामध्ये अलिकडच्या काही दिवसांत वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे. यात अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल ६१३ मुले कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषत: बाधितांचे प्रमाण मोठे आहे. मात्र या वयोगटातील लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसत असले, तरी या मुलांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

(हेही वाचा : ‘ते’ फडणवीस नव्हे, तर ‘फर्द नलीस’! राज ठाकरेंनी सांगितला आडनावांचा इतिहास)

दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली!

शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षांत आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक ११ हजार ८८६ मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात ६,७७३ मुले तर ५,११३ मुलींचा समावेश आहे. या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दहा लाख मुलांची तपासणी: जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली. ६० पेक्षा अधिक मुले करोनाबाधित दिसून आली होती. याशिवाय सुमारे पाचशे मुलांमध्ये करोनासदृश लक्षणे आढळून आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.