पंधरा दिवसांमध्येच अंडे यांची बदली एम -पश्चिम विभागात, संजय सोनावणेंवर पुन्हा एन विभागाची जबाबदारी

127

मुंबई महापालिकेच्या आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांची बदली घाटकोपरच्या एन विभागात करण्यात आल्यानतर अवघ्या १५ दिवसांमध्ये पुन्हा त्यांची बदली चेंबूर एम पश्चिम विभागात करण्यात आली आहे. तर एन विभागाचे सहायक आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या कार्यकारी अभिंयता संजय सोनावणे यांच्याकडे पुन्हा त्याच विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जर सोनावणे यांना पुन्हा एन विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सोपवायची होती तर आयुक्तांनी १५ दिवसांकरता हे बदलीचे आदेश का काढले असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे.

कार्यकारी अभियंता संजय सोनावणे एन विभागात नियुक्त 

मुंबई महापालिकेच्या तीन सहायक आयुक्तांच्या बदलीचे तसेच त्यांच्यावरील अतिरिक्त कार्यभार कमी करण्यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. यामध्ये करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याकडे जो एम पश्चिम विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता,त्यातून त्यांना कार्यमुक्त करत करनिर्धारण व संकलन विभागाची पूर्णपणे जबाबदारी सोपवली आहे. मोटे यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार कमी करताना एन विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्त केलेल्या मृदुल अंडे यांच्याकडे या विभागाचा भार सोपवण्यात आला आहे.

( हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पुढच्या आठवड्यात संपूर्ण मंत्रिमंडळ घेणार शपथ?)

मृदूल अंडे या आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी असल्याने त्यांची बदली १३ जुलै २०२२ रोजी एन विभागाच्या सहायक आयुक्तपदी केली होती. परंतु अवघ्या १५ दिवसांमध्येच त्यांची बदली एन विभागातून एम पश्चिम विभागात करण्यात आली आहे. अंडे यांची बदली पुन्हा एम पश्चिम विभागात करताना कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांना परत एकदा एन विभागात नियुक्त करण्यात आले आहे. अजित कुमार आंबी यांची एस विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्तजागी एन विभागाच्या सहायक आयुक्तपदी कार्यकारी अभियंता संजय सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून सोनावणे योग्यप्रकारे या विभागाची धुरा वाहत असताना अचानकपणे त्यांची बदली करत त्यांना मलनि:सारण विभागात पुन्हा पाठवण्यात आले आणि त्याठिकाणी मृदुला अंडे यांची नियुक्ती केली होती. परंतु १५ दिवसांमध्ये या बदलीचे आदेश फिरवण्याची वेळ आयुक्तांवर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.