अमृता फडणवीसांना अर्वाच्य शब्द आणि शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक

85

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याने आणि अर्वाच्य शब्द उच्चारल्याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे. या महिलेचा मोबाईल जप्त करण्यात आला असून बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून ही महिला शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा- अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणाचा तपास आता CID कडे, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश)

समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या महिलेचे नाव स्मृती पांचाळ असे आहे. पोलिसांनी या महिलेचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या महिलेने गणेश कपूर या बनावट नावाने अमृता फडणवीस यांना शिवीगाळ केली होती. ७ सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टखाली या महिलेने अमृता फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्ट अर्वाच्य शब्दांत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ही समजताच एका अज्ञात फेसबुक युजरविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, अटक केल्यानंतर ही महिला फेक अकाऊंट वापरून अमृता फडणवीसांना शिवीगाळ करत असल्याचे समोर आले. या महिलेने गणेश कपूर नावाने फेक अकाऊंट तयार केले होते. यावरून ही महिला आक्षेपार्ह पोस्ट करत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.