Congress खासदाराने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

67
Congress खासदाराने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
Congress खासदाराने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील सीतापूर (Sitapur) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस (Congress) खासदार राकेश राठोड (Rakesh Rathod) यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा (Chakresh Mishra) यांनी दि. १८ जानेवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काँग्रेस (Congress)खासदारावर बलात्काराचा आरोप केला आहे आणि या प्रकरणाशी संबंधित पुरावे सादर केले आहेत. या आधारावर कोतवाली पोलिसांनी दि. १७ जानेवारी रोजी एमपी राठोड यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

( हेही वाचा : MoneyAge Scam च्या प्रमुख आरोपीच्या मालमत्ता जप्तीसह १७ बँक खातीही गोठवली

तसेच मिश्रा पुढे म्हणाले की, महिलेने १५ जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये तिने सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून खासदार राकेश राठोड लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण करत होते. त्यांनी महिलेला राजकीय क्षेत्रात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

पीडितेने पोलिसांना इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग देखील दिले. पीडितेने सांगितले की, खासदाराकडून मला धमकावले जात होते. या प्रकरणात, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तिचा जबाबही न्यायालयासमोर नोंदवण्यात आला. पोलिसांनी पीडित महिलेला सुरक्षाही पुरवली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.