Veer Savarkar : वीर सावरकरांवर राहुल गांधींना प्रश्न विचारणाऱ्या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या महिला पत्रकाराला धक्काबुक्की; ‘गोदी मीडिया’ म्हणत घोषणाबाजी

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिला पत्रकार साखी गिरि यांना राहुल गांधी यांच्यासमोर धक्काबुक्की होत असतानाही राहुल गांधी यांनी मूकसंमती दर्शवली.

1277
राहुल गांधी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागणार का, तुम्ही शिवाजी पार्क येथे भाषणात पुन्हा वीर सावरकर यांचा अवमान करणार का, असा थेट सवाल हिंदुस्थान पोस्टच्या महिला पत्रकार साखी गिरि यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला. त्यावेळी राहुल गांधींच्या समोरच त्या महिला पत्रकारावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत तिला दूर लोटले. त्यावेळी राहुल गांधी यांनी या सर्व गैर प्रकाराला मूकसंमती दर्शवली.

राहुल गांधींसमोरच महिला पत्रकाराचा अवमान 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा चैत्यभूमी येथे आली, तेव्हा राहुल गांधी यांनी तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन बाहेर पडून राहुल गांधी वाहनात बसले असतानाच ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या महिला पत्रकार साखी गिरि यांनी थेट ‘हिंदुस्थान पोस्ट’चा बूम गाडीत बसलेल्या राहुल गांधी यांच्या जवळ नेला आणि ‘वीर सावरकर  (Veer Savarkar) यांची माफी मागणार का?’ असा थेट सवाल केला. त्याच वेळी वाहनाच्या बाजूने उभे असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिला पत्रकार साखी गिरि यांना धक्काबुक्की करत त्यांना बाजूला ढकलले. हा सगळा प्रकार राहुल गांधी यांच्या समोरच घडला. इतर वेळी महिलांच्या सन्मानावर भाषणबाजी करणाऱ्या राहुल गांधी यांनी केवळ ‘वीर सावरकर  (Veer Savarkar) यांची माफी मागणार का’, असा प्रश्न विचारला म्हणून पत्रकार साखी गिरि यांच्यावर होणाऱ्या धक्काबुक्कीला जाणीवपूर्वक मूकसंमती दर्शवली.
काँग्रेसचे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी साखी गिरि यांना घेरून थेट ‘गोदी मीडिया, गोदी मीडिया’, असे म्हणत पत्रकार साखी गिरि यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी साखी गिरि यांनी ‘मी पत्रकार असून मला राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे’, अशा शब्दांत सुनावले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.