महिलेस मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी; मनसेने केली दिलगिरी व्यक्त

145

गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या बॅनरला मनाई करणाऱ्या महिलेला मनसेचे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यावर आता मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाल केल्याबद्दल मनसेने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या विनोद अरगिले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

( हेही वाचा : Asia Cup 2022 : रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान लढतीचा थरार; असे असेल सुपर ४ चे शेड्युल)

मनसेकडून दिलगिरी

१ सप्टेंबर २०२२ रोजी कामाठीपूरा या परिसरात घडलेली घटना पाहून मन विषन्न झाले. राज ठाकरेंनी यांनी महिलांचा सदैव आदर केला तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना घडलेल्या घटनेबाबत मनसेकडून परिपत्रक जारी करत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कामाठीपूरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1565703781064777728

दरम्यान, विनोद अरगिले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात या महिलेने अपशब्द वापरल्याने राग आला असे स्पष्टीकरण अरगिले यांनी दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.