महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे – Pankaja Munde

69
महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे - Pankaja Munde
महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे - Pankaja Munde

आगामी विधानसभा निवडणूकीची (Assembly Elections) तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेतेमंडळी सुद्धा प्रचारसभेत व्यस्त आहेत. तर राजकीय वर्तुळात आगामी विधानसभा निवडणुक ही दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रचारसभांचा जोर वाढत चालला असून, पंकाजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुणे येथे महिलांना संबोधित केले, तसेच महिला फुकट पैसे घेणार नाहीत. त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील. असे विधान केले.      (Pankaja Munde)    

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुणे येथे महिलांना संबोधित करताना म्हणाल्या की, महिलांना फुकट पैसे घेणारच नाहीत. त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील. महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान भुवया उंचावणारे ठरले आहे.

(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या)

रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे (Ramabai Ambedkar Women Empowerment Centre) आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाच्या संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे’ (The Sugar Technologists Association of India) उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ‘ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट’च्या संचालक शीतल आगाशे, ‘एमएसएमई’चे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, जयंत भावे आदी उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.