भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांची नावे घेतली होती. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले होते. त्यावर प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेऊन तिने आमदार धस यांना माफी आपली माफी मागावी, असे म्हटले. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने प्राजक्ता माळी हिच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
(हेही वाचा काँग्रेसने माजी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांच्या पार्थिव शरीराचा केलेला अवमान; वाचा एक क्लेशदायक कहाणी…)
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ताच्या तक्रारीची महाराष्ट्र महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल, महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवले पाहिजे. कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत. काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत, म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे, याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल, असे म्हटले आहे. (Prajakta Mali)
Join Our WhatsApp Community