Congress : राहुल गांधी यांच्या स्वप्नावर महिला काँग्रेसचे विरजण

138
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसचा पहिलाच प्रयोग काँग्रेस फ्लॉप झाला आहे. महिला काँग्रेसच्या कार्यक्रमला असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे. तर, काही महिला दिल्लीत पर्यटनासाठी आल्या असल्याचे दिसून आले.
rahul1
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महिला काँग्रेसने देशभरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि महिला ब्लॉक अध्यक्ष यांचे दोन दिवसाचे संमेलन बोलविले आहे. दिल्लीतील ताळकटोरा स्टेडियममध्ये आयोजित हा कार्यक्रम आगामी काळातील पाच राज्यात होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीत महिला पदाधिकारी आणि ब्लॉक अध्यक्षाच्या मनात जोश भरण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
rahul2
मात्र, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा कार्यक्रम फुस्स झाला असल्याचे चित्र स्टेडियममध्ये बघायला मिळाले. मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षासह तमाम पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मुंबई महिला काँगेसच्या अध्यक्षा अनिसा बागुल आणि त्यांच्या टीमच्या पदाधिकारी यांनी या कार्यक्रमला हजेरी लावणे टाळले आहे, असे काही महिलाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात महिला काँग्रेसच्या 160 पदाधिकारी आहेत. यातील फक्त 60 महिला येथे आल्या आहेत. शिवाय महाराष्ट्रात जवळपास 600 ब्लॉक महिला अध्यक्ष आहेत. यातील फक्त 430 जणी आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, महिला काँग्रेसचा हा कार्यक्रम राजकीय कमी आणि दिल्ली पर्यटन जास्त असल्याचे दिसून आले. टाळकटोरा स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्या बघितल्या तर याची प्रचिती येते. मुळात, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा घेण्याचं स्वप्न राहुल गांधी बघत आहेत. राहुल गांधी यांच्या या स्वप्नावर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनीच विरजण सोडले असल्याचे दिसून आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.