केंद्राने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, त्यामध्ये महिला आरक्षणाचे विधेयक (Women’s Reservation Bill) अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर झाले. तब्बल ४५४ खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान करत पाठिंबा दिला, मात्र चर्चा घडली ती केवळ २ विरोधी मतांची. त्यामुळे अचानक हे दोन विरोधी मते कुणाची याचा शोध माध्यमांमध्ये सुरु झाला, अखेर ते दोन खासदार एमआयएमचे निघाले. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
या विधेयकात काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, टीएमसी, एडीएमके अशा स्वतःला निधर्मी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला, मात्र त्याला अपवाद ठरला तो एमआयएम हा पक्ष. केवळ या पक्षाच्या २ खासदारांनी या विधेयकाला (Women’s Reservation Bill) विरोध करत विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे मुसलमानांचा पक्ष असलेल्या एमआयएमची विचारधारा महिला विरोधी, महिला सशक्तीकरणाच्या विरोधात, महिला सबलीकरणाच्या विरोधात आहे, हे अधोरेखित झाले आहे.
मुसलमान कायम महिलांना बुरख्यात आणि कायम पुरुषी वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मुसलमानांमधील बुरसटलेली मानसिकता त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एमआयएम पक्षाने मुसलमानांतील ही बुरसटलेली विचारधारा अधोरेखित केली. लोकसभेत बुधवारी, २० सप्टेंबर रोजी महिला आरक्षणाचे विधेयक (Women’s Reservation Bill) मांडले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे हे विधेयक आहे. या विधेयकाला केवळ एमआयएमच्या दोन खासदारांनी विरोध केला आहे. एमआयएमचे दोन खासदार यांनी या विधेयकाला विरोध केला. स्वतः एमआयएमचे प्रमुख, खासदार असुद्दीन ओवैसी यांनी आमचा या विधेयकाला विरोध असल्याचे जाहीर केले.
Join Our WhatsApp Community