नवी दिल्ली,
महिला आरक्षण विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आजच समापन होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन समाप्त होवू शकते. या विधेयकावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे. चर्चेच्या शेवटी मतदान होणे आहे. विधेयकाला मंजुरी मिळणे जवळपास निश्चित होणार आहे. अशातच, महिला विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली की अधिवेशन समाप्तीची घोषणा केली जावू शकते.
सूत्रानुसार, विशेष अधिवेशन बोलाविण्यामागचा सरकारचा हेतू आता पूर्ण झाला आहे. सरकारने महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक (Women’s Reservation Bill) पारित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. सरकारचा हा अजेंडा आता पूर्ण झाला आहे. यामुळे कालावधीच्या एक दिवसापूर्वी अधिवेशनाचे सूप वाजू शकते. अधिवेशन 18 सप्टेंबरपासून ते 22 सप्टेंबरपर्यंत बोलाविण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय.
राज्यसभेत महिला आरक्षणावरील चर्चेची सुरवात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली. यानंतर मनोज झा, संजय राउत, प्रियंका चतुर्वेदी, संदीप पाठक यांच्यासह विविध पक्षांच्या खासदारांनी आपले मत व्यक्त केले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community