बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण युद्धपातळीवर सुरु

104

बाळासाहेबांचा ९ वा स्मृतीदिन येत्या १७ नोव्हेंबर रोजी असून या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण व डागडुजीचे काम युध्दपातळीवर महापालिकेच्या जी/उत्तर विभाग व उद्यान विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. हे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

स्मृतीस्थळाचे सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण व डागडुजी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

(हेही वाचा : सर्व मुंबईकरांना लसीची पहिली मात्रा लागू, आता दुसरीची प्रतीक्षा)

सोमवारपर्यंत काम पूर्ण होईल

स्मृतीस्थळावरील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्यातून सुशोभित झाडांची रोपे आणली गेली आहेत. यामध्ये रेड पॉईंटसेटीया, यलो पॉईँटसेटीया आणि जलबेरा आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी २५० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉईंटसेटीया आणि २०० यलो पॉईँटसेटीयाची आहेत, तर २५० सफेद शेवंतीची, प्लांबेंगो आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केले जात आहे. शिवाय सिव्हिल कामे, विद्युत कामे, रंगरंगोटी करण्यात येत आहे. महापालिका जी-उत्तर विभागाच्या उद्यान विभागातील उद्यान अधिकारी हे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पाहत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये हे काम सोमवारपर्यंत पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.