“सत्ताधारी पक्षाला रोखण्यासाठी कामाला लागा”

85

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी नाशिकपासून महाराष्ट्र दौऱ्याचा श्री गणेशा केला. राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या पदाधिका-यांची आज बैठक घेतली.

पक्षाची ताकद वाढवणार

आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला रोखण्यासाठी महत्त्वाच्या मुद्यांवर काम करायला सुरूवात करा. कोणत्याही परिस्थितीत जास्तीजास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिका-यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची ताकद वाढविण्यावर पदाधिकारी आणि राज ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा झाली.

( हेही वाचा : बेळगावातील शिवरायांच्या अवमानाचा विधान परिषदेत निषेध )

मनसेकडून तयारी

महाराष्ट्रात आगामी काळात महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. इतर पक्षांकडून जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच मनसेही प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. तशी तयारी आतापासूनच मनसेकडून सुरू आहे. यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या पदाधिका-यांची बैठक झाली

या बैठकीला मनसे नेते अनिलजी शिदोरे, बाबू वागस्कर, अध्यक्ष किशोर शिंदे, उपाअध्यक्ष रंजित शिरोळे, गणेश सातपुते उपाअध्यक्ष सचिन चिखले, विशाल मानकरी, राजू सावळे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, अंकुश तापकीर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.