Amitसराकरने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधातून सूटका झाल्याने, मुंबईतल्या कोळीवाड्यांनी होळीच्या सणाला बुधवार पासूनच सुरुवात केली आहे.वरळी कोळीवाड्यात साजरी करण्यात आलेल्या होळीला मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. जुन्या परंपरा आणि चालीरिती जपत ही होळी जल्लोषात साजरी करण्यात आली.
निर्बंधमुक्त होळी
कोरोनाचे महासंकट आणि कोरोनाचे निर्बंध यातून सूटका झाल्यानंतर,आता होळी सणाच्या निमीत्ताने आयुष्यात अनेक रंग भरले जाणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होळी खेळण्याचा आनंद लूटता येणार आहे. यावेळी मुंबईतील कोळी वाड्यांमध्ये जुन्या पारंपारिक चालीरिती नुसार होळी खेळण्यात आली. यावेळी कोळीबांधवांचा आनंद त्यांच्या चेह-यावरुन ओसंडून वाहत होता. मुंबईचा मूळ नागरिक असलेल्या कोळी समाजानं आपल्या जुन्या परंपरा आणि चालीरिती आजही जपल्या आहेत.
( हेही वाचा: कोट्यावधीच्या तोट्यात असणा-या महावितरणाचा ‘असा’ही महाविक्रम! )
View this post on Instagram