वरळीत आदित्य ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

92

वरळी मतदार संघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदेंच्या गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वाॅर्ड क्रमांक 195 मधील नगरसेवक होते. समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा: सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: मनसेचे बांदेकरांना थेट आव्हान; ‘हिंमत असेल तर… )

राष्ट्रवादी काॅंग्रेस निशाण्यावर

शिंदे गट आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादी काॅंग्रेस निशाण्यावर आहे. शिंदे गट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या 22 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची तयारी करत असल्याची माहिती आहे. यामध्ये काही मोठ्या नेत्यांचा समावेश असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीती हा पक्षप्रवेश होऊ शकतो. या निमित्ताने शिंदे गट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांना राजकीय शह देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.