अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी थकबाकीदारांकडून 10 हजार कोटींहून अधिक रक्कम वसूल केली आहे. सीतारामन म्हणाल्या, यूपीए सरकारच्या काळात बँकांना बुडीत कर्जाचा एक रुपयाही परत मिळाला नाही. द्रमुकचे खासदार टीआर बालू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या, देशात पहिल्यांदाच थकबाकी वसुली करण्यात आली आहे.
काॅंग्रेसला हे ऐकावेच लागेल
यूपीए सरकारला वसुलीत अपयश आल्याने एनपीएचा बोजा वाढल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसला हे कटू सत्य ऐकावे लागेल, कारण काँग्रेसच्या राजवटीत केवळ राजकीय प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले. युपीए सरकारच्या काळात थकबाकी वसूल न झालेल्या मुद्द्यावरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत जोरदार हल्ला चढवला. देशात पहिल्यांदाच आमच्या सरकारने कर्जबुडव्यांकडून पैसा परत मिळवला आहे. याआधीच्या युपीए सरकारला एकही पैसा वसूल करता आलेला नाही, असं म्हणत सीतारामन यांनी काॅंग्रेसवर टीका केली.
( हेही वाचा: आनंदाची बातमी! यंदा पगार आणि नोक-याही वाढणार )
10 हजार कोटींहूनही अधिक रक्कम वसूल
अॅप आधारित होणा-या वित्तीय कंपन्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणावरही सरकार लक्ष ठेवून असल्याचं त्या म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी एकूण कर्जबुडव्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन, 10 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल केल्याचही सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.