उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढत्या प्रभावामुळे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वंशाचे राजकीय भविष्य धोक्यात सापडले आहे. म्हणूनच अखिलेश यादव यांनी कुटुंबातील सदस्यासाठी सुरक्षित मतदार संघाचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. सूत्रानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे अखिलेश यादव यांच्या पायाखालची जमीन सरकाली आहे.
समाजवादीचा बालेकिल्ला असलेल्या आणि गेल्या निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी पराभूत झालेल्या जागांवर अखिलेश विशेष लक्ष देत आहेत . यादव कुटुंबाचा प्रभाव असलेल्या जागा हातातून जाऊ शकतात अशी माहिती अंतर्गत सर्वेक्षनातून पुढं आली आहे. यामुळे कुटुंबाला वाचवायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत त्यांनी यादव कुटुंबीय ज्या जागांवर निवडणूक लढवतात त्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी “पीडीए” (मागास, दलित, अल्पसंख्याक) तसेच कुटुंबातील सदस्य ज्या जागांवर लढतात त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अखिलेश यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या आझमगढ लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत सपाने माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. आता धर्मेंद्र त्यांच्या जुन्या बदाऊनमधून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
(हेही वाचा –Central Reserve Police Force : गणवेशात व्हिडियो आणि रिल बनवू नका, केंद्रीय सुरक्षा रक्षकांसाठी कडक निर्देश)
खुद्द अखिलेश यादव यांनी यापूर्वी बुडाऊन लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत तसे संकेत दिले आहेत. फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रा. राम गोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याचा खुलासा खुद्द काका शिवपाल सिंह यादव यांनीच गेल्या काही दिवसांत फिरोजबाद येथील सभेत दिले होते. अक्षयसोबतचा आपला फोटो वायरल करीत शिवपल यादव यांनी ट्विट केले की, “इस बार ये चाचा फिरोजाबाद संसदीय चुनाव में अक्षय की विजय निमित्त बनेंगे।” वर्ष 2019 के चुनाव में अक्षय 28 हजार वोटों से शिवपाल यादव के कारण ही चुनाव हार गए थे। शिवपल त्यावेळी अखिलेश यादव यांच्यावर नाराज होते. आणि या जागेवर आपला उमेदवार उभा करून 91 हजार मते मिळविली होती.
कनौज मधून अखिलेश यादव लढणार आहेत. मागच्या वेळेस त्यांनी पत्नी डिम्पल यादव यांना उतरविले होते. तेव्हा त्यांचा 12 हजार मताने पराभव झाला होता. या जागेवर थोडी मेहनत घेतली तर ही जागा आपल्या ताब्यात येऊ शकते ही बाब अखिलेश यादव यांना माहित आहे. याच कारणामुळे त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते कंनोजला जातात. आजमगडमधून शिवपल यादव निवडणूक लढणार असल्याचे संकेत आहेत. ते जोनपूर आणि आजमगडला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. डिम्पल यादव पुन्हा एकदा मैनपुरी मधून मैदानात उतरणार आहेत.