यशवंत जाधव चढवणार लोकांच्या घरांवर ताडपत्री

यशवंत जाधवांच्या विभागातील नागरी सुविधांची कामे आता संपलेली नसून, त्यांना आता विभागातील लोकांच्या घरांवर ताडपत्री चढवण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबई महापालिकेच्या निधीचा उपयोग करुन नागरी सुविधा आणि वस्तूंचे वाटप करण्यात पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शक्कल लढवली आहे. यावेळी टॅब, लॅपटॉप, व्यायामाचे साहित्य याबरोबरच ज्यूट पिशव्या आणि चक्क ताडपत्रीचे वाटप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात विकास निधी स्वत:च्या प्रभागात फिरवून घेतला. आता यशवंत जाधव यांनी या वस्तूंची खरेदी करुन, त्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यशवंत जाधवांच्या विभागातील नागरी सुविधांची कामे आता संपलेली नसून, त्यांना आता विभागातील लोकांच्या घरांवर ताडपत्री चढवण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

महापालिका निधीत ताडपत्रीच्या खर्चाची तरतूद नाही

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २०९चे प्रतिनिधीत्व करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खरेदी करण्यास समितीने मान्यता दिली आहे. यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्प मंजूर करताना स्थायी समितीच्या स्तरावर विशेष निधीची तरतूद करुन, त्यातून ताडपत्री देण्याचा सांकेतांक निर्माण करुन घेतला होता. त्यानुसार जाधव यांनी १ कोटी रुपयांच्या ताडपत्री खरेदी करुन, आपल्या विभागातील जनतेला ती वाटणार आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारे ताडपत्री महापालिकेच्या निधीतून घेण्याची तरतूदच नाही. त्यामुळेच प्रशासनाने जाधव यांच्या विभागातील अशा वस्तूंच्या खरेदीसाठी केलेले प्रस्ताव अडवून ठेवले होते. यामध्ये ज्यूट पिशव्यांचा प्रस्तावही अडवला. परंतु त्यानंतर प्रशासनाने त्यांचा अडवून ठेवलेला प्रस्ताव पुन्हा मोकळा करुन दिला आणि त्यानंतर हा ताडपत्रीच्या प्रस्तावाला परवानगी दिली.

(हेही वाचाः शून्य सांडपाणी व्यवस्थापन…आणि बरेच काही!)

इतर नगरसेवकांचीही मागणी

जाधव हे समिती अध्यक्ष असल्याने ते आपला निधी अशाप्रकारे वापरत असले, तरी ज्या समस्या त्यांच्या विभागात आहेत, त्याच समस्या इतर नगरसेवकांच्याही प्रभागात आहेत. त्यामुळे एकट्या जाधव यांना अशी सवलत देण्यापेक्षा प्रशासनाने याचाच आधार देत ताडपत्री वापरण्यास परवानगी दिली पाहिजे, असा सूर आता नगरसेवकांकडून आळवला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी विभागातील जनतेसाठी ताडपत्री खरेदी केल्या असल्या, तरी आगामी अर्थसंकल्पात स्थायी समितीच्या स्तरावर प्रत्येक नगरसेवकांना या ताडपत्रीसाठी विशेष तरतूद करुन घेत विभागातील गरीबांच्या घरांवर ताडपत्री चढवता येणार आहे.

(हेही वाचाः सव्वा महिना उलटूनही ऑक्सिजन प्लांट कागदावरच, हाच काय मुंबई पॅटर्न?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here