नागपूर हिवाळी अधिवेशनाचे (Nagpur Winter Session) १५ दिवस, त्यानंतर शनिवार-रविवारला जोडून आलेली नाताळची सुटी आणि आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुन्हा शनिवार रविवारचा सुट्टी मुळे अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याने मंत्रालयात (Mantralaya) शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मंत्रालयात ‘इयर एण्ड मूड’ (Year End Mood) असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कर्मचारी हे २ जानेवारीनंतरच परतणार असल्याने मंत्रालयातील गजबज कमी झाली आहे. (Mantralaya)
नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) आटोपून परतल्यानंतर अनेकांनी विश्रांती घेणे पसंत केले आहे, तर पुर्व नियोजित प्लान करीत कौटुंबिक सहलीवर गेले आहेत. त्यातच या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting) नसल्याने मंत्र्यांसह आमदारही आपापल्या मतदारसंघात आहेत. मंत्रालयात एकाध दुसराच मंत्री असल्याने सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मंत्री कार्यालयात कोणीही प्रमुख अधिकारी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. (Mantralaya)
(हेही वाचा – Ramanand Sagar : रामायण मालिकेसारखी अजरामर निर्मिती करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रामानंद सागर)
सत्तेतील प्रमुख नेते, मंत्री बाहेरगावी दौऱ्यावर आणि अधिकारी सुट्टीवर गेल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांत शासन निर्णयाची संख्या रोडवली आहे. या संपूर्ण आठवड्यात अशीच स्थिती पहावयास मिळाली. आता नव्या वर्षातच मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्याचवेळी मंत्री-आमदारांसह अधिकारी- कर्मचारी ‘ताजेतवाने’ होऊन मंत्रालयात (Mantralaya) हजेरी लावतील, अशी मिश्किल चर्चा मंत्री दालनांत सुरू आहे. (Mantralaya)
सर्वसामान्यांची खेप मात्र वाया
मंत्रालयात (Mantralaya) संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक आपली कामे घेऊन येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याने त्यांच्या खेपा वाया जात आहेत. त्यामुळे २ जानेवारीनंतरच या, असा तोंडी निरोप शिपाई आणि अन्य सहाय्यकांकडून अभ्यागतांना दिला जात आहे. (Mantralaya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community