विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांविरोधात जोरदार आंदोलन केले. आंदोलनात आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षरितीने लक्ष्य केले आहे, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी मुंबईबदद्ल केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधा-यांनी आक्रमक भूमिका घेतली.
खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्ती मृत्यू प्रकरणातील AU या फोन नंबरचा संबंध आदित्या ठाकरेंशी आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरुन शिंदे गट आणि भाजप नेते आक्रमक झाले. शिंदे गटाच्या मुख्य प्रतोदांच्या हातात हे बॅनर होते.
( हेही वाचा: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; भाजप आमदार नितेश राणेंची मागणी )
विरोधकांच्या हातात श्रीखंडाचे डबे
नागपूर NIT भूखंडाच्या आरोपांवरुन अधिवेशनात गुरुवारी विरोधकांनीही आंदोलन केले. हातात श्रीखंडाचे डबे घेऊन भूखंड घोटाळ्याविरोधात मविआ नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर पडळकर म्हणाले, विरोधकांकडे कोणताही महत्त्वाचा मुद्दा नाही. महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सभागृहात बोलणे अपेक्षित होते, पण ते झालेले नाही.
Join Our WhatsApp Community