‘कुंकू-टिकली’नंतर आता रामदेव बाबांच्या महिलांबाबत केलेल्या ‘या’ वादग्रस्त विधानाची चर्चा, बघा व्हिडिओ

योगसाधनेमुळे नेहमी चर्चेत असणारे पतंजलीचे प्रमुख योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य केले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

काय म्हणाले रामदेव बाबा

ठाणे येथे एका संमेलनात रामदेव बाबा यांनी हिंदीत एक विधान केलं. ते म्हणाले, या संमेलनासाठी साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही… आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे रामदेव म्हणाले, महिला साड्या नेसून पण चांगल्या दिसतात, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या दिसतात.. आणि माझ्या मते काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे.

(हेही वाचा – ‘मनसे’ची नवी टॅगलाईन… राज ठाकरेंच्या मेळाव्याचा पहिला टीझर रिलीज)

ठाण्यात शुक्रवारी महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे रामदेव बाबा यांनी वरील वादग्रस्त विधान केले. रामदेव बाबांनी केलेल्या या विधानावरून आता टीका होत आहे. सोशल मीडियावर रामदेव बाबांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर कमेन्ट्स देखील करत आहे.

बघा व्हिडिओ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here