Yogesh Kadam यांचे कुणाल कामरा प्रकरणावर मोठे वक्तव्य; कायद्यानुसार कारवाई होणार

63
Yogesh Kadam यांचे कुणाल कामरा प्रकरणावर मोठे वक्तव्य; कायद्यानुसार कारवाई होणार
Yogesh Kadam यांचे कुणाल कामरा प्रकरणावर मोठे वक्तव्य; कायद्यानुसार कारवाई होणार

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कथित अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, त्याला चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. या प्रकरणात कदम यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले, “कुणाल कामरा (Kunal Kamra) याने वारंवार सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्यांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. आधी त्याने एक गाणं गायलं, आता पुन्हा सरकारची खिल्ली उडवण्यासाठी त्याने नवीन गाणं बनवलं आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी, असं वाटतं. कोर्टाचा अवमान करून त्याला काहीच होणार नाही, हा त्याचा भ्रम आहे. कायद्यानुसार त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल आणि त्याला चौकशीसाठी बोलावलं जाईल.”

(हेही वाचा – कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक आणणार; राज्य सरकारची High Court मध्ये माहिती)

कदम (Yogesh Kadam) यांनी पुढे सांगितले की, कुणाल कामरा (Kunal Kamra) याने स्वतः म्हटलं आहे की तो चौकशीला सहकार्य करेल. “त्याने आपली बाजू मांडावी. तो आरोपी असला तरी पोलिसांनी जी नोटीस दिली आहे, त्या कायद्यानुसार त्याला संरक्षण दिलं जाईल,” असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये (Habitat Studio) केलेल्या तोडफोडीबाबतही कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “तोडफोड झाली, याचं आम्ही समर्थन करत नाही. पण दोष फक्त शिवसैनिकांना देऊन चालणार नाही. त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कुणाल कामरा (Kunal Kamra) याने एका शोमध्ये गायलेल्या पैरोडी गाण्यामुळे वाद निर्माण झाला होता. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी स्टुडिओमध्ये तोडफोड केली आणि या प्रकरणात पोलिसांनी कामरा याच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली असून, त्यांना नंतर जामीन मिळाला आहे.

(हेही वाचा – Dharavi Cylinder Blast Case : वाहन पार्क करणारे आणि बेकायदेशीर पार्किंग चालवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल)

योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी हेही स्पष्ट केले की, कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) आणि बँक खात्यांची चौकशी केली जाणार आहे. “या प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे, हे शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी विधान परिषदेत सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणात कामरा याने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

हा वाद आता राजकीय आणि कायदेशीर पातळीवर तापत असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिक घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे. कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर कायदेशीर कारवाई कशी पुढे जाते आणि तो या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.