राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा गट सध्या वादात सापडला आहे. कारण आहे रोहित पवार. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व ताब्यात घेतल्यावर शरद पवार यांच्या वाट्याला राहिलेल्या काही आमदारांच्या गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडली तरी आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) समर्थन केले आहे. मात्र हेच रोहित पवार आज अडचणीत आले आहेत, त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशी मागील कारण आहे ब्राह्मणद्वेष आणि हेच रोहित पवार आजही स्वतःला आपले आजोबा शरद पवार यांना मार्गदर्शक मानतात. शरद पवार स्वतःला नास्तिक म्हणवतात, मात्र नास्तिकतेचे प्रदर्शन करताना ते कायम हिंदुद्वेष, ब्राह्मण द्वेष करताना दिसतात.
मराठा आरक्षणाचे आंदोलन भरकटले, हिंसक बनले, मनोज जरांगे पाटलांनी राज्याच्या लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका सुरु केली. आव्हानाची भाषा बोलू लागले. त्याचा कहर झाला जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठाद्वेषी. बामणी कावा रचणारे असे खालच्या पातळीला जाऊन आरोप केले. जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण द्वेष प्रकट केला आणि फडणवीस ब्राह्मण असल्याने ते मराठा विरोधी आहेत, असे मराठा समाजात पसरवले. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलक याच दृष्टीने सोशल मीडियावर मत मांडू लागले.
त्याची परिणती म्हणून योगेश सावंत या बारामतीमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याने एका मराठा आंदोलकाने ‘गावरान विश्लेषक’ यूट्युब चॅनलवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीसांबाबत एकेरी उल्लेख करत ‘देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मणांना ३ मिनिटांत संपवू’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तो व्हिडीओ योगेश सावंत याने फॉरवर्ड केला. या प्रकरणी योगेश सावंत सध्या अटकेत आहे. त्याला सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव आणला म्हणून त्यांचीही चौकशी होणार आहे.
एकंदरीतच शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनुकरण करणारे जात्यंध, हिंदुद्वेष्टे आणि ब्राह्मण द्वेषी बनतात, हेच दिसत आहे. कारण शरद पवार कायम जाहीर व्यासपीठावरून समाजविघातक, समाजातील दोन घटकामध्ये फूट पडणारी वक्तव्ये करत असतात, ज्याचे अनुकरण मग मनोज जरांगे पाटील यांच्यासह योगेश सावंत यांच्यासारखे तरुण करू लागतात.
शरद पवारांनी याआधी केलेली हिंदूद्वेषी आणि ब्राह्मण द्वेषी वक्तव्ये
- सप्टेंबर २०१८ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, राम मंदिर लवकरात लवकर उभारले गेले पाहिजे अन्यथा देशात महाभारत घडेल. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी, ‘देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. रामायण आणि महाभारत यांची देशाला गरज नाही.’
- रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा ही उपाधी दिल्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही.
- राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही भाजप त्यावर राजकरण करत आहे.
- जितेंद्र आव्हाड यांनी राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता असे वक्तव्य केले होते. तेव्हा त्यांची पाठराखण करताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते की, जितेंद्र आव्हाडांनी रामायणातील दाखले देऊन हे वक्तव्य केले आहे. त्यातून त्यांनी रामाची अप्रतिष्ठा केली नाही.
- २०२० मध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी लखनऊ येथे भाषण करताना म्हटले, न्यायालयाने राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट उभारण्यास सांगितले, तसे मशीद उभारण्यासाठी ट्रस्ट उभारण्याकरिता का सांगितले नाही? राम मंदिर बनवण्यासाठी सरकार आर्थिक साहाय्य देत आहे मग मशीद बांधण्यासाठीही का देत नाही?