Yogi Adityanath : विद्यार्थिनीचा विनयभंग होताना तुम्ही काय करत होतात? योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षकाला सुनावले

116
Yogi Adityanath : विद्यार्थिनीचा विनयभंग होतांना तुम्ही काय करत होतात? योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षकाला सुनावले

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आता थेट पोलीस अधीक्षकालाच सुनावले आहे. योगी आदित्यनाथ यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जवळपास ३ तास १५ मिनिटं ही आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये महिलांसंबंधी गुन्हे, गुन्हेगारी नियंत्रण, त्यांच्याविरुद्ध कारवाई या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली.

या वेळीच (Yogi Adityanath) पोलीस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रमुखही हजर होते. या बैठकीमध्ये सर्वाधिक चर्चा आंबेडकर नगरमध्ये एका विद्यार्थिनीची ओढणी खेचलेल्या घटनेची होती. या घटनेवरुन योगी आदित्यनाथ यांनी आंबेडकर नगर पोलीस अधिक्षकांना खडे बोल सुनावले.

(हेही वाचा – Asian Games 2023 : घोडेस्वारीतही भारताची सुवर्ण कामगिरी; पदकांच्या यादीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये)

“विद्यार्थिनीचा विनयभंग होताना तुम्ही काय करत होतात?, जर तुम्हाला सरकारने आदेश दिले नसते तर काय आरोपींना मिठाई भरवली असती का? त्यांची आरती काढली असती का? असा प्रश्न योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पोलीस अधीक्षकाला विचारला आहे. जिल्ह्यात काय सुरु आहे हे मला माहिती आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

पोलीस अधीक्षकाला खडे बोल सुनावल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी हाथरसच्या जिल्हा प्रमुखांना धारेवर धरलं आहे. “गोहत्या कशी काय होत आहे? असं विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी फक्त ३० किलो गोमांस नेलं जात होतं असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकल्यानंतर योगी आदित्यनाथ संतापले. गोमांसाची तस्करी होत आहे, म्हणजे गोहत्या केली जात आहे” असं सांगत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ते रोखण्याचे निर्देश दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.