Yogi Aditya Nath : पराभवाला घाबरून केदारनाथला गेले राहुल गांधी – योगी आदित्यनाथ यांची टीका

91

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने ते सभांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (८ नोव्हेंबर ) सांगितलं की, मध्य प्रदेशात पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार आहे.राहुल गांधी केदारनाथच्या दौऱ्यावर गेल्याचं चित्र पाहून मला समाधान वाटलं. विधानसभेच्या सेमी फायनलमध्ये काँग्रेसचा पराभव होत असल्याची त्यांना आधीच खात्री आहे. म्हणूनच ते मैदान सोडून पळून गेले आहेत असेही म्हटलं आहे. (Yogi Aditya Nath)

योगी आदित्यनाथ यांनी अजयगड, पन्ना येथे आयोजित जाहीर सभेत .मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या काळात उत्तराखंडमध्ये एक शोकांतिका झाली होती. केदारनाथ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक दिवस लोक चिंतेत होते, पण काँग्रेसने कोणाचीच दखल घेतली नाही. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला सेवेची संधी देण्याची मागणी केली होती, पण तसं झाले नाही. नरेंद्र मोदींना संधी मिळताच उत्तराखंड आणि केंद्र सरकारने मिळून केदारनाथला भव्य स्वरूप दिलं आहे.

(हेही वाचा : Maratha-OBC Reservation : “दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका” – मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दिली समज)

राहुल गांधींच्या केदारनाथ दौऱ्याची उडवली खिल्ली
राहुल गांधीं केदारनाथ दौऱ्याची खिल्ली उडवत योगी म्हणाले की, संकटकाळात राहुल गांधी केदारनाथला गेले हे चांगलं झाले. काँग्रेसचा पराभव होत आहे, त्यामुळेच अडचणीच्या काळात राहुल गांधी केदारनाथमध्ये राहून प्रार्थना करत आहेत. काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस प्रत्येक गरिबांना रेशन सुविधा देऊनही हे करू शकली असती. पण तसं केलं नाही. राज्यात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र डबल इंजिनच्या भाजपा सरकारने हे सर्व केलं. काँग्रेसला समस्या म्हणत योगी म्हणाले की, दहशतवाद हे काँग्रेसचे योगदान आहे. फरक स्पष्ट आहे, एक समस्या आहे आणि दुसरा उपाय आहे असेही ते बोलले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.