काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, Yogi Adityanath यांचा हल्लाबोल

147
काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, Yogi Adityanath यांचा हल्लाबोल
काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, Yogi Adityanath यांचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या पावन भूमीला कोटी कोटी प्रणाम करतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील नमन करतो. (Yogi Adityanath)

औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये

योगी आदित्यनाथ म्हणाले, “काँग्रेसचा (Congress) जाहीरनामा हा मुस्लिम आरक्षण समर्थित आहे. काँग्रेस के शहजादे काय म्हणतात ? मी एका झटक्यात गरिबी मिटवतो. वेल्थ इमरजन्सीच्या माध्यमातून गरिबी हटवणार असे राहुल गांधी यांनी सांगितले. आपल्या संपत्तीमधील अर्धा वाटा घेवून तो मुसलमानांना वाटण्याचा त्यांचा मनोदय आहे. औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये घुसलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवा. काँग्रेस व त्यांचे सर्व सहकारी हे सारखेच आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला. (Yogi Adityanath)

आम्ही सगळे कत्तलखाने बंद करून टाकले

जे दंगे करणारे होते त्यांचे सगळ्याचे आम्ही ‘राम नाम सत्य’केले. काँग्रेस निवडून आल्यावर गो हत्या करण्यासाठी परवानगी देणार अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का ? उत्तर प्रदेशातील आम्ही सगळे कत्तलखाने बंद करून टाकले आहे. काँग्रेस व इंडिया गठबंधन यांचा कोणताच उद्देश नाही. यांच्याकडे कुठलेही व्हिजन सुध्दा नाही. देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आमचे देशाप्रती समर्पण आहे. असे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले आहेत. (Yogi Adityanath)

भारताचे खातील अन् पाकिस्तानचे गुणगान करतील त्यांना भारतात स्थान नाही

भाजपा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पुढे आली आहे. आमची निवडणूक गरिबांना न्याय देण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आमची निवडणूक आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीचा नारा जितेंगे तो लूटेंगे हा त्यांचा संकल्प आहे. आम्हाला भारताला सर्वोच्च स्थानी घेवून जायचं आहे. 2014 च्या पूर्वी भारताला जगात सन्मान कमी होता. आज तो सन्मान वाढला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात बॉम्बस्फोट घडत होते. गरीब भुकेने मरत होते. आतंकवादी कारवाया वाढत होत्या. सण उत्सव काळाच्या आधी भारतात दंगे व्हायचे. आज सीमा सुरक्षित, आतंकवादाचे नामोनिशाण मिटवून टाकले आहे. फटाका जरी फुटला तरी पाकिस्तान सांगते आमचा त्यात हात नाही. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात राहायला जावे. भारताचे खातील अन् पाकिस्तानचे गुणगान करतील त्यांना भारतात स्थान नाही. (Yogi Adityanath)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.