कुणाल कामराच्या वादग्रस्त टिप्पणीवर Yogi Adityanath यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘काही लोकांनी देशाचा…’

110
Yogi Adityanath : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांचे नाव न घेता केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या अडचणी वाढत आहेत. या प्रकरणी मुंबईच्या खार पोलिसांनी विनोदी कलाकाराला समन्स पाठवला आहे. संबंधित प्रकरणांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. (Yogi Adityanath)

(हेही वाचा – चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली २.० कार्यान्वित; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन)

कुणाल कामरा यांनी केलेल्या टिप्पणीवरील प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर दुसऱ्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. देशाचे तुकडे करण्यासाठी आणि विभाजनाची दरी वाढवण्यासाठी काही लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आपला जन्मसिद्ध हक्क मानला आहे हे दुर्दैवी आहे.” असे विधान योगी आदित्यनाथ यांनी केले.

‘कायदेशीर कारवाई केली जाईल’
“स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे. एखादा कॉमेडीयन अशा प्रकारे गद्दार म्हणू शकत नाही. मात्र, जर जाणूनबुजून कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटलं.

(हेही वाचा – Rani Baug मधील पेंग्विन कक्षाचे व्यवस्थापन पुन्हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच)

दरम्यान, पोलिसांनी कामरा यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहेत. खरंतर, कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर आहे, म्हणून त्याला व्हॉट्सअॅपवरही हे समन्स पाठवण्यात आले आहे. कुणाल कामरा (Kunal Kamra) यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, खार पोलिसांचे एक पथक सोमवारी कुणाल कामराच्या घरी गेले आणि त्याच्या पालकांनाही समन्सची प्रत दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.