अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्याआधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर असताना रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या धाम नामकरण करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार आता या निर्णयावर बुधवार, २७ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. याच यादीत आता अयोध्या (Ayodhya) स्थानकाचेही नाव जोडले गेले आहे. अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या जंक्शनची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी अयोध्या (Ayodhya) जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्याची इच्छा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. यानंतर बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले.
(हेही वाचा BJPची महाराष्ट्रात लोकसभेसाठी रणनीती ठरवण्याच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार)
Join Our WhatsApp Community