योगी सरकारने Supreme Court मध्ये सादर केली कावड यात्रा मार्गावरील मुसलमान दुकानदारांची नावे

136

उत्तर प्रदेशातील पवित्र कावड यात्रा मार्गावर ढाबा जिहाद करून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या मुस्लिम ढाबा चालकांची नावेच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सादर केली. हिंदू देवदेवतांच्या नावाने हे मुसलमान ढाबा चालक हिंदू भाविकांची फसवणूक करणारा धंदा चालवत होते. नेमप्लेटच्या मुद्यावर योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आपली बाजू मांडली. योगी सरकारने न्यायालयात काही दुकानांची आणि त्यांच्या मालकांची नाव सांगितली. यात एका दुकानाच नाव ‘पंडित जी का ढाबा’ आहे, पण दुकानाचा मालक मुसलमान आहे. कावड यात्रा मार्गावरील ढाब्यांचे फोटोग्राफ जोडले आहेत. ‘राजा राम भोज फॅमिली टूरिस्ट ढाबा’च्या नावाने ढाबा चालवणाऱ्या दुकानदाराच नाव वसीम आहे. ‘राजस्थानी खालसा ढाबे’ च्या मालकाच नाव फुरकान आहे, ‘पंडित जी वैष्णो ढाबे’ च्या मालकाच नाव सनव्वर राठौड आहे.

(हेही वाचा शैक्षणिक कागदपत्रांमध्ये धर्मांतरणाचा उल्लेख आवश्यक; Kerala High Court चे निर्देश)

काही मुसलमानांनी कोर्टात धाव घेतली

कावड यात्रा मार्गावरील ढाबाचालक मुद्दामून ढाब्याला हिंदू नाव देतात आणि भाविकांच्या धार्मिक भावनांची खेळ करून धंदा करतात असा स्पष्ट आरोप योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केला. कावड यात्रेमध्ये अनवाणी पायाने पवित्र जल घेऊन जाणाऱ्या कोट्यवधी हिंदू भाविकांची धार्मिक भावना दुखावली जाऊ नये, यासाठी कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांवर मालकांचे स्पष्ट नाव लिहिण्याचे निर्देश योगी सरकारने दिले होते. मात्र काही मुसलमानांनी त्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तात्पुरता तो निर्णय स्थगित करायला लावला होता परंतु आता योग्य सरकारने हिंदू देवदेवतांच्या नावाचे ढाबे आणि त्यांचे मालक मात्र मुस्लिम अशी यादीच न्यायालयात सादर केली. दुकानांच्याबाहेर नाव लिहिण्याचे निर्देश देण्यात आले. योगी सरकारने कायदा सुव्यवस्थेसाठी खबरदारी म्हणून अनुच्छेद 71 अंतर्गत सौहार्द कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.